Join us
Daily Top 2Weekly Top 5

​स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्‌स २०१८ मध्ये या कलाकारांनी मारली बाजी. जाणून घ्या कोण ठरले सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 15:48 IST

स्क्रीन अॅवॉर्ड्‌स २०१८ पुरस्कार नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, वरूण धवन, माधुरी दिक्षित, क्रिती ...

स्क्रीन अॅवॉर्ड्‌स २०१८ पुरस्कार नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, वरूण धवन, माधुरी दिक्षित, क्रिती सेनॉन, एलियाना डिक्रूझ, टायगर श्रॉफ, तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, विद्या बालन आणि इरफान खान यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. या पुरस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आणि वरुण धवनने केले. सलमान खान आणि वरूण धवन यांनी आपल्या सूत्रसंचालनाच्या वेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले. क्रिती सेनॉन, भूमी पेडणेकर आणि सीमा भार्गव यांनी देखील सलमानला सूत्रसंचालनासाठी साथ दिली. स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात एलियाना डिक्रूझने बादशाहो मधील मेरे रश्क ए करम या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स सादर केला. याशिवाय टायगर श्रॉफ, तापसी पन्नू आणि क्रिती सेनॉन यांनी देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिले. या पुरस्काराचा ग्रॅन्ड फिनाले परफॉर्मन्स खुद्द दबंग खानने दिला. जुडवाचे दोन सुपरहिट चेहरे सलमान खान आणि वरूण धवन यांनी पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली. पुरस्कार सोहळ्यात माधुरी दिक्षितने वरूण धवनसोबत तम्मा तम्मा या गाण्यावर ताल धरला.कर्मा, ताल, खलनायक, कर्ज यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक सुभाष घई यांना दिग्गज-लेखक गुलजार आणि सलमान खान यांच्या हस्ते लाइफटाइम अॅचिव्हमेंट अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. अभिनेता विनोद खन्ना यांना त्यांचे प्रिय मित्र अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली.स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्‌स पुरस्काराचे मानकरीः बेस्ट फिल्म - दंगल बेस्ट अॅक्टर मेल - इरफान खान (हिंदी मीडियम)बेस्ट अॅक्टर फीमेल - विद्या बालन (तुम्हारी सुलू)बेस्ट डायरेक्टर - नितेश तिवारी (दंगल) बेस्ट अॅक्टर मेल क्रिटिक्स चॉईस - राजकुमार राव (न्यूटन)बेस्ट अॅक्टर फीमेल क्रिटिक्स चॉईस - कोंकणा सेन शर्मा (लिपस्टिक अंडर माय बुरखा)बेस्ट मूव्ही क्रिटिक्स चॉईस - न्यूटनबेस्ट अॅक्टर सपोर्टिंग फीमेल -  नेहा धुपिया (तुम्हारी सुलू) / मेहेर विज (सीक्रेट सुपरस्टार)बेस्ट अॅक्टर सपोर्टिंग मेल - राजकुमार राव (बरेली की बर्फी)अॅक्टर इन ए कॉमेडी रोल - वरूण धवन (बद्रीनाथ की दुल्हनिया)स्टार स्क्रीन अॅवॉर्ड नथिंग टू हाईड -  शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनबेस्ट प्लेबॅक सिंगर मेल - अरिजित सिंग (जालिमा आणि गलती से मिस्टेक) स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्‌स २०१८ चा सोहळा स्टार प्लसवर प्रेक्षकांना ३१ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे.