दीपिका ‘एमटीव्ही एमा’च्या मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 22:53 IST
प्रियांका चोप्रा पाठोपाठ आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दीपिका पादुकोन पुरस्कार वितरण करताना दिसणार आहे. नेदरलँडमधील रॉटरडेम येथे आयजित करण्यात आलेल्या ...
दीपिका ‘एमटीव्ही एमा’च्या मंचावर
प्रियांका चोप्रा पाठोपाठ आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दीपिका पादुकोन पुरस्कार वितरण करताना दिसणार आहे. नेदरलँडमधील रॉटरडेम येथे आयजित करण्यात आलेल्या एमटीव्ही युरोप म्युझिक अवॉडर्समध्ये ती विजेत्यांना आपल्या हस्ते पारितोषिक प्रदान करणार आहे. प्रसिद्ध गायिका बियोंसे नोल्स व गायक जस्टिन बीबर यांच्या सोबत ती मंचावर दिसणार आहे. एमटीव्ही युरोप म्युझिक अवॉडर्स हा युरोपातील नांमाकित म्युझिक अवॉर्ड सोहळा मानला जातो. हा म्युझिक अवॉर्ड ‘एमटीव्ही एमा’ नावाने प्रसिद्ध आहे. सहा नोव्हेंबर रोजी आयोजित या सोहळ्याला दीपिका हजेरी लावणार आहे. याचे निमंत्रण मिळताच तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेय ‘‘वाट पाहू शकत नाही, 6 नोव्हेंबर एमटीव्ही एमा (एमटीव्ही म्युझिक अवॉडर्स)’’ सोबनत ‘प्रेझेंटिग अॅट द एमटीव्ही एमाज् 2016 दीपिका पादुकोन’ हे लिहीलेला फोटो अपलोड केला आहे. या निमित्ताने दीपिकाची आंतरराष्ट्रीय मंचावर दखल घेतली जात असल्याचे दिसते.