Join us

SS Rajamouli : “प्रभाससमोर हृतिक रोशन काहीच नाही...”, राजमौलींचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:40 IST

SS Rajamouli : राजमौलींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून हृतिक रोशनचे चाहते भडकले आहेत.

एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे एस. एस. राजमौली (SS Rajamouli ) या नावाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. सध्या राजमौलींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून हृतिक रोशनचे (Hrithik Roshan ) चाहते भडकले आहेत. आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेऊ यात...

तर व्हिडीओ 2009 सालचा अहे.  प्रभासचा (Prabhas) ‘बिल्ला’ हा सिनेमा रिलीज होणार होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राजमौलींनी हृतिक व प्रभासची तुलना केली होती.  सोशल मीडियावर राजमौलींचा हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यात राजमौलींनी हृतिकच्या ‘धूम 2’चा उल्लेख करताना दिसतात. ते म्हणतात, ‘जेव्हा 2 वर्षांपूर्वी धूम 2 रिलीज झाला होता, तेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये इतक्या चांगल्या दर्जाचे सिनेमे का बनत आहेत, असा विचार करून मला दु:ख झालं होतं. आपल्याकडे हृतिक रोशनसारखे हिरो नाहीत का? असा प्रश्न मला पडला होता. पण आत्ता आत्ता मी बिल्लाचं गाणं, पोस्टर आणि ट्रेलर पाहिला आणि ते पाहून मी वाक्य म्हणू शकतो की, प्रभाससमोर हृतिक रोशन काहीच नाही...,’

राजमौलींचा हा व्हिडीओ ‘अपला बॉलिवूड’ नामक ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे आणि तो समोर येताच बॉलिवूडप्रेमी शिवाय हृतिकचे चाहते संताप व्यक्त करत आहेत.

एका संतप्त युजरने यावर कमेंट करत राजमौलींना जोरदार टोमणा मारला. ‘त्यांनी हॉलिवूड सीन कॉपी करून बाहुबली बनवला अन् भारतीय प्रेक्षक त्यांना महान दिग्दर्शक समजू लागले. पण हे दुर्दैवी आहे. ते हृतिकबद्दल असे शब्द कसे वापरू शकतात,’असं या युजरने लिहिलं. ‘बिल्ला हा शाहरूखच्या डॉनचा रिमेक आहे आणि हृतिकचा अंगठा आणि त्याचा डान्स प्रभासपेक्षाही फेमस आहे,’ असं अन्य एका युजरने लिहिलं.

‘खरंच राजमौली  या बिल्ला सारख्या व्हिडीओ गेमची तुलना धूम 3 सोबत  आणि आपल्या पाव वडा(प्रभास)ची तुलना हृतिक सोबत करताहेत...,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा गतवर्षी प्रदर्शित झाला. या सिनेमाने सुमारे 1155 कोटींचा बिझनेस केला होता.

टॅग्स :एस.एस. राजमौलीप्रभासहृतिक रोशन