Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 18:14 IST

Sridevi & Boney Kapoor Love Story: बॉलिवूडमध्ये एक अशीही अभिनेत्री आहे जिने ज्या तरुणाला राखी बांधली, तोच पुढे जाऊन तिचा पती बनला. आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण तेव्हा आधीपासूनच विवाहित होता. एवढंच नाही तर त्याला दोन मुलेसुद्धा होती. तरीही चित्रपट निर्माता असलेला हा तरुण या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता.

भाऊ बहिणीमधील प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण गेल्या आठवड्यात उत्साहात साजरा झाला. सर्वसामान्य आणि राजकीय नेत्यांपासून ते फिल्मी अभिनेत्यांपर्यंत सर्वांनीच रक्षाबंधन साजरं केलं. मात्र बॉलिवूडमध्ये एक अशीही अभिनेत्री आहे जिने ज्या तरुणाला राखी बांधली, तोच पुढे जाऊन तिचा पती बनला. आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण तेव्हा आधीपासूनच विवाहित होता. एवढंच नाही तर त्याला दोन मुलेसुद्धा होती. तरीही चित्रपट निर्माता असलेला हा तरुण या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. या अभिनेत्रीचं नाव आहे श्रीदेवी.

बोनी कपूर आणि श्रीदेवी हे एकमेकांच्या प्रेमात पडले असले तरी एकदा अशी वेळ आली होती की ज्यामुळे तिला बोनी कपूर यांना राखी बांधावी लागली होती. बोनी कपूर यांच्या आईने श्रीदेवीला बोनी कपूर यांना राखी बांधायला सांगितले होते. त्याचं झालं असं की, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात असलेल्या संबंधांची कुणकूण बोनी कपूर यांच्या आईला लागली होती. त्यामुळे रक्षाबंधना दिवशी त्यांनी पूजेच्या ताटात राखी ठेवली आणि श्रेदवीला बोनी कपूर यांना राखी बांधण्यास सांगितले. दक्षिणेत लहानाची मोठी झालेल्या श्रीदेवीला या सणाची माहिती होती. मात्र जेव्हा राखी बांधण्यास सांगण्यात आले तेव्हा तिचा चेहरा पडला होता, असे सांगितले जाते.

बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मौना शौरी असं होतं. बोनी आणि मोना यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन अपत्ये होती. मात्र बोनी कपूर यांच्या जीवनात श्रीदेवीची एंट्री झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, वडिलांच्या दुसऱ्या विवाहामुळे मी तणावाखाली गेलो होतो, असे अर्जुन कपूरने एकदा सांगितले होते. मात्र बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या मुली असलेल्या जान्हवी आणि खुशी कपूर या सावत्र बहिणींसोबत अर्जुन कपूरचे चांगले संबंध आहेत. दरम्यान, श्रीदेवी ही लग्नापूर्वीच बोनी कपूर यांच्यापासून गर्भवती राहिली होती.

आपल्या दुसऱ्या विवाहाबाबत माहिती देताना बोनी कपूर यांनी आपण शिर्डीमध्ये अगदी गोपनीय पद्धतीने विवाह केला होता. तसेच त्याच दिवशी हनिमूनला गेलो होतो, असे सांगितले.  

टॅग्स :श्रीदेवीबोनी कपूरबॉलिवूडरक्षाबंधन