साऊथ चित्रपटाचे सुपरस्टार कॉमेडियन आणि अभिनेते वेणू माधव यांचे आज निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. आज दुपारी 12.20 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते लिव्हर व किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. वेणू माधव यांचे जवळचे मित्र वामसी काका यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. वेणू माधव यांच्या अकस्मात निधनाने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
Venu Madhav Death: साऊथचे सुपरस्टार कॉमेडियन वेणू माधव यांचे निधन, 39 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:49 IST
प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन झाले.
Venu Madhav Death: साऊथचे सुपरस्टार कॉमेडियन वेणू माधव यांचे निधन, 39 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
ठळक मुद्दे150 पेक्षा अधिक तेलगू व तामिळ चित्रपटांत त्यांनी काम केले.