Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोफिया हयातने पोस्ट केला हनिमूनचा व्हिडिओ युजर्सने म्हटले बहन तुम तो नन थी ना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:49 IST

​सोफिया हयातने तिच्या हनिमूनचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावरील युजर्सने सोफियाला चांगलेच सुनावले आहे.

सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ती तिच्या कोणत्या ना कोणत्या विधानासाठी नेहमीच वादात असते. ती काही दिवसांपूर्वी नन बनली होती. तिने ट्विटरवरून याबाबत तिच्या फॅन्सना माहिती दिली होती. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे तिने नन होण्याचा निर्णय घेतला होता. पण काहीच दिवसांत तिने तिचा निर्णय बदलला. सोफिया नन झाली त्या काळात ती केवळ पांढऱ्या कपड्यात वावरत असे. पण आता पुन्हा तिने शॉर्ट कपडे घालायला सुरुवात केली आहे आणि एवढेच नव्हे तर ती आता लग्नबंधनातदेखील अडकली आहे.तिने व्लाड स्टॅनेस्कू या तिच्या प्रियकरासोबत एप्रिलमध्ये विवाह केला. सध्या ते दोघे हनिमूनला इजिप्तला गेले आहेत. तिने तिच्या हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये सोफियाचा हॉट अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर तिने तिच्या पतीसोबतचे काही इंटिमेट फोटो देखील पोस्ट केले आहेत. तसेच तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. सोफियाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर हे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. तुझे प्रायव्हेट व्हिडिओ पोस्ट करू नकोस... तुझे आयु्ष्य म्हणजे व्यवसाय नाहीये... ते विकू नकोस अशी कमेंट काहींनी लिहिली आहे तर काहींनी तू तर नन होतीस ना असा थेट प्रश्नच सोफियाला विचारला आहे. सोफियाला सोशल मीडियावर युजर्सने चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर पतीसोबतचे इंटिमेट फोटो पोस्ट करण्याची सोफियाची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील पतीसोबतचे बोल्ड आणि रोमँटिक व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. तसेच यापूर्वी  सोफियाने  तळव्यांवर स्वस्तिकचा टॅटू गोंदवून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोवर लोकांनी चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.     Also Read : ​सोफिया हयातने लांघल्या सर्व मर्यादा; शेअर केला पतीसोबतचा ‘इंटिमेट’ व्हिडिओ!