Join us  

​सोनू सूदला जॅकी चॅनने काय दिली भेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 12:42 PM

सोनू सूद हा फिटनेसबद्दल अतिशय जागरूक अभिनेता आहे. सोनू सगळे काही चुकवणार पण आपले व्यायामाचे आणि खाण्याचे वेळापत्रक तो ...

सोनू सूद हा फिटनेसबद्दल अतिशय जागरूक अभिनेता आहे. सोनू सगळे काही चुकवणार पण आपले व्यायामाचे आणि खाण्याचे वेळापत्रक तो अजिबात चुकवत नाही. सोनूच्या या शिस्तप्रीय स्वभावाने कुणाला इंम्प्रेस केले असेल तर जॅकी चॅनला. होय, सोनू सूदचे हे ‘फिटनेस प्रेम’ पाहून मार्शल आर्ट कुंग फू एक्सपर्ट आणि सुपरस्टार जॅकी चॅन अतिशय प्रभावित झालाय. सोनू सूद व जॅकी चॅन सध्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे शूटींग अलीकडे संपले. पण शूटींगदरम्यानचे सगळे वातावरण ‘चंगळ-मंगळ’ करणारे असले तरी सोनू मात्र सेटवर अतिशय शिस्तीत वागला. व्यायाम आणि जेवणाची वेळ त्याने कधीच चुकवली नाही. जॅकी यामुळे कमालिचा प्रभावित झाला. अशावेळी सोनूच्या पाठीवर कौतुक आणि शाबासकीची थाप द्यायला तो कसे विसरणार? शाब्बासकी म्हणून जॅकीने त्याचे किक -बॉक्सिंग ग्लोव्ज सोनूला भेट म्हणून दिले. अर्थात हे काही साधेसुधे बॉक्सिंग ग्लोव्ज नव्हते. तर त्यावर जॅकीची स्वाक्षरी आणि सोनूसाठी एक खास संदेश लिहिलेला होता. आता जॅकीकडून इतकी अविस्मरणीय भेट मिळाल्यावर सोनू हुरळून गेला नसेल तर नवल. हे ग्लोव्ज मिळाल्यानंतर सोनूने पूर्णवेळ  ते हातात घालून मिरवलेत. आता ‘कुंग फू योगा’चे शूटींग संपल्यानंतर हे ग्लोव्ज सोनूच्या पुरस्कारांच्या कपाटात गेलेत. कारण, जॅकीकडून मिळालेले हे ग्लोव्ज कुठल्याही सन्मानाशिवाय कमी नाहीत. होय ना?‘कुंग फू योगा’ या चित्रपटात जॅकी चॅन, सोनू सूद यांच्यासोबत दिशा पाटणी हिची मुख्य भूमिका आहे.