सोनू सूद म्हणतो, जॅकी चॅनकडून खूप काही शिकता आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 19:49 IST
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अभिनयाच्या व शरिरष्टीच्या बळावर लवकर आपले वेगळे स्थान निर्माण केले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्ससोबत त्याने ...
सोनू सूद म्हणतो, जॅकी चॅनकडून खूप काही शिकता आले
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अभिनयाच्या व शरिरष्टीच्या बळावर लवकर आपले वेगळे स्थान निर्माण केले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्ससोबत त्याने काम केले आहे. आंतरराष्ट्रीय स्टार जॅक चॅन याच्या आगामी ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात झळकणार आहे. सोनू सूद याने जॅकी चॅनसोबत काम करतानाचे अनुभव एका कार्यक्रमात शेअर केले. मला त्याच्याकडून आपल्या मुळाशी नाळ कशी जुळवून ठेवावी हे शिकता आले असे सोनू सूद याने सांगितले. सोन म्हणाला, आपण जेव्हा यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतो तेव्हा बरेच काही विसरून जातो. मात्र जॅकी चॅन कडून मला आपल्या मुळाशी नाळ कशी जुळवून ठेवावी हे शिकता आले. जॅकी चानसोबत काम करताना खूप शिकायला मिळाले. तुम्ही आयुष्यात काय साध्य केले याला महत्व नसल्याचे तो मला म्हणाला. जॅकी चानला यावर्षीच्या सुरुवातीलाच आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोनू सूद लवकरच जॅकी चानची भूमिका असलेल्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौºयाच्यावेळी तीन चित्रपटांचा, दोन देशात झालेल्या कराराचा एक भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टॅन्ली टॉन्ग यांनी केले आहे. यात अमायरा दस्तूरचीही प्रमुख भूमिका आहे.‘कुंग फू योगा’ हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. करीत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनू सूदला आंतराष्ट्रीय मंच मिळणार असून यामुळे तो आनंदी आहे. हा चित्रपट भारत व चीनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.