Join us  

स्टॉलवर काम करणाऱ्या 'त्या' मुलाच्या मदतीसाठी धावला सोनू सूद; नेटकरी म्हणतायत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 2:39 PM

वडिलांच्या निधनानंतर त्यांचा फूड स्टाॅल सांभाळणाऱ्या या मुलाचे नाव जसप्रित असं आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दिसतोय. हा मुलगा फक्त दहा वर्षाचा आहे आणि तो फूड स्टाॅल चालवत आहे. आपल्या आणि आपल्या बहिणीच्या पोटासाठी आणि शिक्षणासाठी हा मुलगा हे काम करत आहे. हेच नाही तर या मुलाच्या वडिलांचे निधन दहा दिवसांपूर्वीच झालं आहे. काही दिवसांपुर्वीच अभिनेता अर्जून कपूरनेही या मुलासाठी मदतीचा हात पुढे  केला होता. आता अर्जून कपूरनंतर अभिनेता सोनू सूदही त्याच्या मदतीसाठी धावला आहे. 

वडिलांच्या निधनानंतर त्यांचा फूड स्टाॅल सांभाळणाऱ्या या मुलाचे नाव जसप्रित असं आहे.  त्याचा व्हिडीओ पाहून थेट सोनू सूद हा या मुलाच्या मदतीला धावून आलाय. सोनू सूद याने मुलाचा व्हिडीओ रीट्विट केला. यात त्यानं लिहलं, 'आधी शिक्षण घेऊया मित्रा. मोठं झाल्यावर यापेक्षाही मोठा व्यवसाय करशील'. सोनु सूदने जसप्रीतशी संपर्क संवाद साधला. सोनू या मुलाला दिल्लीत भेटणार आहे. 

आता सोनू सूद याची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. म्हणजेच काय तर या मुलाचा आणि त्याच्या बहिणीचा शिक्षणाचा खर्च सोनू सूद करण्यास तयार आहे. यामुळेच चाहते हे सोनू सूद याचे काैतुक करताना दिसत आहेत. सोनू सूदने वेळोवेळी आपल्या परोपकारी वृत्तीने अनेकांची मनं जिंकली आहेत.  त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'फतेह' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :सोनू सूदसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया