सोनाक्षीने वापरला जॉनचा फिटनेस फंडा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 18:39 IST
सोनाक्षीने तिचे वजन कमी केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण हे वजन घटवण्यामागे कुणाची प्रेरणा आहे, हे कदाचित तुम्हाला ...
सोनाक्षीने वापरला जॉनचा फिटनेस फंडा!!
सोनाक्षीने तिचे वजन कमी केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण हे वजन घटवण्यामागे कुणाची प्रेरणा आहे, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तर सोनाक्षीच्या सध्याच्या ‘स्लीम-ड्रीम फिगर’मागे तिचा सहकलाकार जॉन अब्राहम याची प्रेरणा आहे. होय, जॉनने दिलेल्या फिटनेस टिप्समुळे तिचे वजन कमी झाल्याचे कळतेय. जॉनने दिलेल्या फिटनेस टिप्स शिवाय स्पेशल डाएटविषयी केलेले मार्गदर्शन यामुळे सोनाक्षी वजन घटवू शकली.डाएट आणि फिटनेसच्या बाबतीत जॉन अतिशय जागृत आहे. वेळेवर व्यायाम, वेळेच्या वेळी जेवण हा त्याचा फंडा आहे. हाच नेमका फंडा सोनाक्षीने वापरला. याबद्दल ती सांगते,‘जॉनने मला माझे वजन कमी करण्याबद्दल सुचविले. तोच माझी पे्ररणा होता. त्याने माझ्याकडे हेल्दी फूड खाण्याचा आग्रह धरला. त्यानेच मला आरोग्यास अपायकारक असलेल्या पदार्थांना ‘नो’ म्हणायला शिकवले. व्यायामाबद्दल तो अतिशय आग्रही असतो. त्याच्याच सततच्या टोकण्यामुळे मी माझ्या खाण्यावर ताबा ठेवू शकले.जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडगोळी सध्या ‘फोर्स २’च्या निमित्ताने प्रचंड चर्चेत आहे. ते दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रथमच ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असल्याने त्यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. येत्या काळात ही केमिस्ट्री कशी रंगतेय, ते बघूच.