विशेष म्हणजे नीलेश परमार सोनाक्षीच्या फॅमिलीचाच एक भाग होता. २०१३ मध्ये गणेश चतुर्थीचा दिवस होता आणि सोनाक्षी शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्या दिवशी नीलेशचाही बर्थ डे होता. मात्र अशातही त्याने सुटी न घेता सोनाक्षीसोबत तो काम करीत राहिला. सोनाक्षीला माहिती होते की, आज नीलेशचा बर्थ डे आहे. पुढे तिने नीलेशला चित्रपटाच्या सेटवरच एक सरप्राइज पार्टी दिली. तसेच केकही कापला. यावेळी सोनाक्षीने तिची व्हॅनिटी व्हॅनही बलूनने डेकोरेट केली होती.
नीलेश सोनाक्षीसोबत तिचा पहिला ‘दबंग’ या चित्रपटापासून काम करीत होता. खरं तर इंडस्ट्रीमध्ये बरेचसे मेकअप आर्टिस्ट आहेत. परंतु सोनाक्षीने नीलेशची निवड केली होती. सोनाक्षीच्या मते, नीलेश नॉन स्टॉप एंटरटेनमेंटचा सोर्स आहे.