Join us

मॅनेजरसोबत होते सोनाक्षी सिन्हाचे अफेयर; सलमान खानच्या पार्टीत सामना होताच झाला तमाशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:22 IST

नुकताच सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सलमानने एका शानदार पार्टीचे आयोजन केले ...

नुकताच सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सलमानने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार उपस्थित होते. अरबाजची एक्स पत्नी मलाइका अरोरा हिच्यासह अरबाजची हिरोईन सनी लिओनी या पार्टीत उपस्थित होत्या. अरबाजच्या गेस्ट लिस्टमध्ये सोनाक्षी सिन्हा हिचेही नाव होते. त्याचबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेंड बंटी सचदेव हादेखील पार्टीत उपस्थित होता. त्यामुळे दोघांचा सामना झाल्यास काय होईल? याची अनेकांना कुणकुण लागली होती. अखेर जे घडायचे ते घडलेच. होय, सोनाक्षी पार्टीत सलमानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर हिच्यासोबत पोहोचली होती. जेव्हा ती या पार्टीत पोहोचली तेव्हा ती चांगलीच फसली गेली. कारण या पार्टीत तिचा एक्स बॉयफ्रेंड बंटी सचदेव हादेखील उपस्थित होता. स्पॉटबॉय डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सोनाक्षीला पार्टीत बंटी असल्याचे समजले तेव्हा तिला धक्काच बसला. ती बंटीला टाळण्याचा प्रयत्न करीत होती. तर बंटी तिच्या आजूबाजूलाच उभा असल्याचे दिसत होते. सोनाक्षीने त्याला टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पार्टीदरम्यान सोनाक्षी खूपच अस्वस्थ दिसली. कदाचित बंटीची उपस्थिती तिला बोचत असावी. अशात बंटीचा अन् तिचा सामना होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती, परंतु सोनाक्षीने अतिशय चातुर्याने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले. बंटी सोहेल खानची पत्नी सीमा सचदेव हिचा भाऊ आहे. त्यामुळे तो सलमान, अरबाज आणि सोहेलचा नातेवाईक आहे. त्यामुळे त्याला या पार्टीचे निमंत्रण मिळणे स्वाभाविक होते. वास्तविक बंटी आणि सोनाक्षी गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करीत आहेत. परंतु ज्या पद्धतीने सोनाक्षी बंटीला टाळत होती, त्यावरून दोघांमध्ये नक्कीच काही ठीक नसावे असे दिसत होते. खरं तर दोघांमध्ये काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले आहे. मात्र याबाबतची फारशी चर्चा झाली नाही. दरम्यान, सोनाक्षी पार्टीत यूलियासोबतच फिरत होती. मात्र बंटी तिच्या आजूबाजूला फिरत असल्याने दोघेही कॉर्नरला उभे राहत असल्याचे दिसून आले. बंटी सोनाक्षीचा मॅनेजर होता. तो तिच्या प्रत्येक असायमेंट हॅण्डल करीत होता. बंटीशी ब्रेकअप झाल्यानंतर सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा तिच्या मॅनेजमेंटचे काम करीत आहे. वास्तविक सोनाक्षी आणि बंटीने कधीही त्यांच्यातील प्रेमसंबंध जगजाहीर केले नाही. मात्र जेव्हा हे दोघे स्पॉट व्हायचे तेव्हा त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा रंगायच्या. सोनाक्षी आणि बंटी दुबईला जेव्हा व्हेकेशन एन्जॉय करायला गेले होते, तेव्हा तर त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. परंतु जेव्हा हे दोघे व्हेकेशनवरून परतले तेव्हा विमानतळाच्या वेगवेगळ्या दरवाजातून दोघे बाहेर पडले. कदाचित तेव्हाच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली असावी. बंटी स्पोर्ट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा मॅनेजर आहे. बंटी विवाहित असून, अंबिका चोहान हिच्याबरोबर त्याने लग्न केले होते. चार वर्ष संसार केल्यानंतर त्याने अंबिकाशी घटस्फोट घेतला. बंटीबरोबरच अंबिका काम करीत होती. बंटीचे दिया मिर्झा, सुश्मिता सेन आणि नेहा धूपिया यांच्याबरोबरही अफेअर होते. असेही म्हटले जात आहे की, जेव्हा बंटी दिया मिर्झा हिला डेट करीत होता, तेव्हा तो नेहा धूपियाशी फ्लर्ट करीत होता. वास्तविक बंटीने कधीही त्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा केलेली नाही.