Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा; यावर्षी होणार आलिया भट्टचे ब्रेकअप अन् ‘या’ अभिनेत्यासोबत होईल पॅचअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:57 IST

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या कधीच लपून राहत नाही. कारण महिन्याकाठी एका तरी स्टारचे ब्रेकअप अन् पॅचअप होते. अशात ...

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या कधीच लपून राहत नाही. कारण महिन्याकाठी एका तरी स्टारचे ब्रेकअप अन् पॅचअप होते. अशात अभिनेत्री आलिया भट्ट हिचे नाव आता चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या समोर येत आहेत की, आलिया आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात प्रेमसंबंध आहेत. परंतु आता त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे या बातमीला एका अभिनेत्रीने दुजोरा दिल्याने, खरंच त्यांचे ब्रेकअप झाले काय याविषयी जोरदार चर्चा रंगत आहे. होय, शॉटगन अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने आलिया आणि सिद्धार्थच्या रिलेशनशिपवरून एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. लवकरच सोनाक्षी नेहा धूपियाच्या वोग बीएफएफ या चॅट शोमध्ये डिझायनर मनीष मल्होत्रा याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. शोच्या एका प्रोमोमध्ये नेहा सोनाक्षीला विचारते की, ‘कोणती जोडी २०१८ मध्ये तुटणार? नेहाच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता सोनाक्षीने आलिया आणि सिद्धार्थचे नाव घेतले. सोनाक्षीच्या या उत्तरावर ही गोष्ट स्पष्ट होत आहे की, आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात नक्कीच काहीतरी शिजत आहे. हे झाले त्यांच्या ब्रेकअपविषयी, परंतु जेव्हा नेहाने सोनाक्षीला पॅचअपविषयी विचारले तेव्हा तिने मनीषकडे बघितले. सोनाक्षी काही बोलणार तोच मनीषने रणबीर आणि आलियाचे नाव घेतले. काही दिवसांपासून एक बातमी समोर येत आहे की, आलिया भट्टची तिचा पहिल्यांदाच को-स्टार बनलेल्या रणबीर कपूरसोबत जवळीकता वाढत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध फुलत असल्यानेच सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्यात दरार निर्माण झाली आहे.