सोनाक्षी सिन्हाने सलमान खानसाठी असे काही केले की जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 20:38 IST
सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या ‘दबंग-३’मध्ये झळकण्याची शक्यता आहे. त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असून, सलमानला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.
सोनाक्षी सिन्हाने सलमान खानसाठी असे काही केले की जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
चित्रपटात येण्याअगोदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे वजन तब्बल ९० किलो होते. सुपरस्टार सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटाची आॅफर मिळाल्यानंतर सोनाक्षीने तिचे ३० किलो वजन कमी केले. आतापर्यंत या सिरीजचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तसेच आता ही बातमीदेखील समोर येत आहे की, सोनाक्षीने ‘दबंग-३’साठी देखील आपल्या फिटनेसवर पुन्हा एकदा फोकस केले आहे. नुकताच सोनाक्षीने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यावरून ही बाब स्पष्ट होते की, सोनाक्षी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी गेल्या काही काळापासून आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत आहे. दरम्यान, सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच फिट आणि सडपातळ दिसत आहे. प्रसिद्ध बातम्यांनुसार, सोनाक्षीने तिचे तब्बल ३५ किलो वजन कमी केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सोनाक्षीने फिट बॉडी मिळविण्यासाठी जीममध्ये तासन्तास घाम गाळला आहे. शिवाय आपल्या डाएटवरही विशेष लक्ष दिले आहे. या फोटोमध्ये सोनाक्षीचे अॅब्स स्पष्टपणे दिसत आहेत. शिवाय तिचा हा फिगर चाहत्यांनाही चांगलाच इम्प्रेस करीत आहे. खरं तर पहिल्यांदाच सोनाक्षी तिच्या फिटनेसवरून चर्चेत आली असे अजिबात नाही, यापूर्वी देखील ती तिच्या फिटनेसवरून लाइमलाइटमध्ये आली आहे. वास्तविक चित्रपटात येण्याअगोदर वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने सांगितले होते की, मी जीममध्ये एक्सरसाइज सुरू केल्यानंतर कधीही वजन तपासले नाही. काही काळानंतर मला याची जाणीव झाली की, मी आता फिट झाली आहे. त्यावेळी सोनाक्षीने शाहिद कपूरचा ट्रेनर हायर केला होता. दरम्यान, सोनाक्षी ‘दबंग-३’मध्येही सलमान खानसोबत बघावयास मिळू शकते. त्यामुळेच ती तिच्या फिटनेसवर अधिक लक्ष देत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरबाज खान करणार आहे.