Join us

​...यामुळे सोनम गेली नाही ‘आयफा’ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 15:51 IST

सध्या बॉलीवूडमधील सर्व आघाडीचे कलाकार स्पेनमध्ये ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी जमलेले असताना बी-टाऊन फॅशनिस्टा सोनम कपूर मात्र तेथून गायब आहे. ...

सध्या बॉलीवूडमधील सर्व आघाडीचे कलाकार स्पेनमध्ये ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी जमलेले असताना बी-टाऊन फॅशनिस्टा सोनम कपूर मात्र तेथून गायब आहे. तिच्या गैरहजेरीमुळे इंडस्ट्रीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ‘आयफा’ऐवजी ती लॉस एंजलिसला गेली आहे.लवकरच सोनम हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून त्यासाठी ती तेथे आॅडिशन देण्यासाठी गेली आहे असे बोलले जातेय. अनिल कपूरच्या हॉलीवूड एजंटने सोनमची विविध निर्माते-दिग्दर्शकांशी भेट घालून दिल्याचेही कळते.मात्र, सोनमच्या जवळच्या एका मित्राने सांगितले की, या सगळ्या अफवा असून सोनम कुठल्याही आॅडिशनला गेलेली नाहीए. आगामी ‘वीरे दी वेडिंग’साठी कॉस्ट्यूम खरेदीसाठी ती ‘एलए’ला गेली असून तेथे चित्रपटातील कास्टची लूक टेस्ट करण्यात येत आहे.तिची बहिण रिया कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून करिना कपूरदेखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.