स्मिता पाटील-राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या व्यसनाविषयी केला खळबळजनक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 21:49 IST
लिजेंड अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते तथा नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर सध्या चांगलाच चर्चेत आहे. होय, ...
स्मिता पाटील-राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या व्यसनाविषयी केला खळबळजनक खुलासा!
लिजेंड अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते तथा नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर सध्या चांगलाच चर्चेत आहे. होय, ड्रग्जविषयीच्या त्याच्या व्यसनाविषयी पहिल्यांदाच प्रतीक बब्बरने एक मोठा खुलासा केला आहे. खरं तर बॉलिवूड सेलेब्स नेहमीच त्यांच्या व्यसनाविषयी लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रतीकने बिंधास्तपणे ‘ड्रग्ज खूप वाईट सवय असून, त्यात मी खूपच वाईट पद्धतीने गोवला गेलो’ असे म्हटले आहे. प्रतीकचा हा खुलासा खळबळ उडविणारा देणारा ठरला आहे. मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीकने मान्य केले की, ‘बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशामुळे आणि अभिनेत्री एमी जॅक्सन हिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे मी पूर्णपणे हतबल झालो होतो. पुढे मी ड्रग्जच्या अधीन गेलो. मला ड्रग्जची अत्यंत वाईट सवय लागली; मात्र आता मी यातून पूर्णपणे रिकव्हर झालो असून, आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करीत आहे. प्रतीकने पुढे बोलताना म्हटले की, ड्रग्जच्या अधीन होणे ही माझी स्वत:ची सर्वस्वी चूक आहे. कारण ड्रग्ज ही माझी पर्सनल चॉइस होती. प्रतीकने एक उदाहरण देताना म्हटले की, ‘ड्रग्जची सवय एखाद्या वाईट लग्नाप्रमाणे आहे. कारण एकदा माणूस त्याच्यात गुंतला की, त्यातून बाहेर पडणे खूपच मुश्कील असते. यावेळी प्रतीकने हेदेखील स्पष्ट केले की, ‘आता मी यातून पूर्णपणे बाहेर आलो आहे. ड्रग्जपासून दूर गेल्यानंतर मी फिटनेसवर अधिक लक्ष देऊन आहे. वास्तविक सर्वसामान्यांचा असा समज असतो की, बॉलिवूड सेलेब्स व्यसनाच्या आहारी जाणे कॉमन असते. परंतु माझ्याबाबतीत जे घडले ते माझ्या भूतकाळामुळे घडले आहे. माझे बालपण खूपच उलथापालथीचे राहिले आहे. ज्याचे उत्तर देणे माझ्यासाठी प्रचंड कठीण आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी मी ड्रग्जचा आधार घेतला होता. परंतु त्यात मी अपयशी ठरलो. प्रतीकने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून केली होती. परंतु पुढे त्याला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. तो सातत्याने चांगल्या भूमिकेच्या शोधात होता. परंतु त्यात तो अपयशी ठरला. आता तो कशा पद्धतीने स्वत:ला सिद्ध करतो, हे बघणे मजेशीर ठरेल.