सलमान खानचे इंडस्ट्रीत जिगरी मित्र आहेत, तसेच शत्रूही. विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग, रणबीर कपूर, सरोज खान या सेलिब्रिटींशी सलमानचे जराही पटत नाही. आता या यादीत आणखी एक नाव चढले आहे, ते कुणाचे तर गायिका सोना मोहपात्राचे. सोनाने पुन्हा एकदा भाईजानशी असा काही पंगा घेतला की, भाईजान नाही पण चाहते मात्र बिथरले. आता हा सगळा मामला काय, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर त्याचे झाले असे की, ‘भारत’चे शूटींग संपल्याचे ट्विट सलमानने केले. हे ट्विट तुमच्या आमच्यासारखे सोनाच्या टाईमलाईवरही झळकले. पण हे ट्विट पाहून सोना जाम भडकली. इतकी की, या व्यक्तिचे ट्विट माझ्या टाईमलाईनवर दाखवू नका, असे तिने ट्विटरवर जाहीर करून टाकले.
सोना मोहपात्राने घेतला भाईजानशी ‘पंगा’! चाहत्यांनी असा घेतला ‘बदला’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:35 IST
सलमान खानचे इंडस्ट्रीत जिगरी मित्र आहेत, तसेच शत्रूही. विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग, रणबीर कपूर, सरोज खान या सेलिब्रिटींशी सलमानचे जराही पटत नाही. आता या यादीत आणखी एक नाव चढले आहे, ते कुणाचे तर गायिका सोना मोहपात्राचे.
सोना मोहपात्राने घेतला भाईजानशी ‘पंगा’! चाहत्यांनी असा घेतला ‘बदला’!
ठळक मुद्देसोनाने सलमानशी पहिल्यांदा पंगा घेतलेला नाही. याआधीही तिने सलमानला लक्ष्य केले होते. काळवीट शिकार प्रकरणानंतर तिने सलमानवर उपरोधिक टीका केली होती.