Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनू निगमवर पुन्हा भडकली सोना मोहपात्रा! वाचा, काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:51 IST

बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनाने सलमान खानशी पंगा घेतला. आता  सोनाने सोनूशी पंगा घेतलाय.

बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनाने सलमान खानशी पंगा घेतला. आता  सोनाने सोनूशी पंगा घेतलाय. होय, सोना व सोनू निगम यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. 

काही दिवसांपूर्वी सोनाने ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत संगीतकार अनु मलिक व गायक कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. यादरम्यान सोनू निगमने अनु व कैलाश यांचा बचाव केला होता. कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप लावणे कितपत योग्य आहे. अनु मलिक खरे तर खूप काही बोलू शकतात. पण ते बोलले नाहीत. समजा मी म्हटले की, तुम्ही माझ्यासोबत गैरवर्तन केले तर तुम्ही सर्वात आधी पुरावे मागणार. पुरावे तर नाहीत ना. तरिही आपण अनेकांची नावं खराब करत आहोत. अशा प्रकरणात तुम्ही एखाद्याला बॅन कसे करू शकता? एखाद्याच्या तोंडचा घास कसा पळवू शकता? एखाद्याच्या कुटुंबाची छळ कसा करू शकता? असे सोनू म्हणाला होता. सोनूच्या नेमक्या वाक्यांवर सोनू मोहपात्रा उखडली होती. आता सोनाने पुन्हा एकदा सोनूला लक्ष्य केले आहे.गत ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी सोना एका शोमध्ये परफॉर्म करणार होती. पण सोनाच्या जागी सोनूने ऐनवेळी कैलाश खेर यांना बोलावले. नेमक्या याच कारणावरून सोनाने सोनूला धारेवर धरले.

‘सोनू निगमसहित पुरूषांच्या अधिकारांसाठी लढणा-या कार्यकर्त्यांना हे जाणून आनंद होईल की, माझा हा तिसरा शो आहे, जो कटकारस्थानांमुळे रद्द केला गेला. मला शोमधून काढून कैलाश खेरला शोमध्ये आणले गेले,’असे ट्विट सोनाने केले.सोनाच्या या टिष्ट्वटवर सोनूने उत्तर दिलेले नाही. आता तो काय उत्तर देतो आणि हा वाद पुन्हा कुठल्या वळणावर जातो, ते बघूच.

टॅग्स :सोना मोहपात्रासोनू निगम