Join us

लास वेगासमधील ‘सिम्रन’चे शेड्यूल संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 14:10 IST

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे गंभीर कथानक, आशयगहन विषय, निवडक स्टारकास्ट, सामान्यांच्या प्रश्नांवर प्रकाश, आगळेवेगळी स्टोरीलाईन. प्रेक्षकांना ...

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे गंभीर कथानक, आशयगहन विषय, निवडक स्टारकास्ट, सामान्यांच्या प्रश्नांवर प्रकाश, आगळेवेगळी स्टोरीलाईन. प्रेक्षकांना उत्तम कलाकृतीचा अनुभव घेता यावा या उद्देशाने चित्रपटनिर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘अलीगढ’,‘सिटी लाईट्स’,‘शहिद’,‘राख’,‘दस कहानियाँ’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांना जन्माला घातल्यानंतर आता ‘सिम्रन’ या उत्कृष्ट कलाकृतीच्या निर्मितीत ते व्यस्त आहेत. नुकतेच ‘लास वेगास’ येथील चित्रपटाचे शेड्यूल त्यांनी संपवले. ही बातमी त्यांनी सोशल मीडियावर ‘अ‍ॅण्ड इट्स अ लास वेगास रॅप! सिम्रन’ या कॅप्शनसह फोटो अपलोड करून चाहत्यांसोबत शेअर केली. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता सोहम शाह यांनी याअगोदर यूएसमध्ये चित्रपटाचे काही सीन्स शूट केले आहेत. यात कंगनाने ३०वर्षीय घटस्फोटित महिलेची भूमिका साकारली आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे कथानक असून पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘तन्नू वेड्स मन्नू’ साठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिच्या करिअरने चांगलीच झेप घेतली. ‘क्वीन’ साठीही तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तिचा समंजस अभिनय, कथानकाशी साजेशी व्यक्तीरेखा हे तिच्या अभिनयाचे गुणच म्हणावे लागतील. आता ‘सिम्रन’ कडूनही तिला खुप अपेक्षा आहेत. चित्रपटासाठी ती विशेष मेहनत घेताना दिसतेय.