Join us  

'शेरशाह' आता 'योद्धा'च्या भूमिकेत;Sidharth Malhotra चा लूक पाहून येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 5:49 PM

Yodha: करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 'योद्धा' या अॅक्शन चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची घोषणा केली होती. त्यानंतर यातील सिद्धार्थचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

उत्तम अभिनयशैली आणि मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra). गेल्या काही काळात सिद्धार्थने एकावर एक सुपरहिट चित्रपट देण्याचा जणू दणकाच लावला आहे. 'शेरशाह' (Shershaah) चित्रपटाच्या यशानंतर लवकरच त्याचा 'योद्धा' (yodha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटातील सिद्धार्थचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 'योद्धा' या अॅक्शन चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची घोषणा केली होती. त्यानंतर यातील सिद्धार्थचा फर्स्ट लूक समोर आला आहे. करणने त्याच्या ट्विटरवर सिद्धार्थचा लूक शेअर केला आहे.

प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थ एका विमानात बसून बचावकार्य करताना दिसत आहे. यात विमानात बसून त्याच्या हातात बंदूक आहे आणि पूर्ण लक्ष केंद्रित करुन तो अॅक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा लूक पाहून अंगावर काटा उभा राहत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

"धर्मा प्रोडक्शनच्या पहिल्या अॅक्शन फ्रेंचाइजीमधून सिद्धार्थ मल्होत्राला एका धमाकेदार अंदाजात तुमच्या समोर सादर करतांना विशेष अभिमान वाटत आहे. योद्धा हा चित्रपट सागर आंब्रे आणि पुष्कार ओझा दिग्दर्शित करत असून ११ नोव्हेंबर २०२२ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे", असं कॅप्शन करण जोहरने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, योद्धा व्यतिरिक्त सिद्धार्थ 'थँक गॉड' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तसंच सिद्धार्थ दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी वेब सीरिजमध्येही काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकरण जोहरबॉलिवूडसिनेमा