Join us

तर सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला 'या' कारणामुळे केले इग्नोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:13 IST

रणबीर कपूर असलेल्या रिलेशनशिपमुळे आलिया आणि कॅटरिनाच्या मैत्रित फूट पडल्याची चर्चा आहे. आता या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे आलियाचा कथित एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचे.

ठळक मुद्देआलिया आणि सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होतीएका इव्हेंटमध्ये सिद्धार्थने आलिया इग्नोर केेले

रणबीर कपूर असलेल्या रिलेशनशिपमुळे आलिया आणि कॅटरिनाच्या मैत्रित फूट पडल्याची चर्चा आहे. आता या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे आलियाचा कथित एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचे. रणबीरच्या आधी आलिया आणि सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.  मीडिया रिपोर्टनुसार नुकताच सिद्धार्थ एका इव्हेंटमध्ये पोहोचला होता. या इव्हेंटमध्ये आलिया भट्टसुद्धा आली होती, मात्र सिद्धार्थने तिला इग्नोर केले. आलिया त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना सिद्धार्थ हसायला सुद्धा तयार नव्हता.  

मिळालेल्या माहितीनुसार या आधीच्या काही इव्हेंटसासुद्धा आलियाने सिद्धार्थला बोलवले होते मात्र त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही.  रणबीरसोबत वाढत असलेल्या मैत्रीमुळे सिद्धार्थ आलियापासून दूर गेला आहे.  आलिया आणि रणबीर पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा मीडियात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. याबाबत नुकतेच आलियाला एका कार्यक्रमाच्या दरम्यान विचारले असता ती सांगते, मी कधीच अफवांवर विश्वास ठेवत नाही.

लवकरच आलिया  करण जोहरच्या 'तख्त'मध्ये दिसणार आहे. तख्त सिनेमात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. 'तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे पे्रम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर