Join us

​मुंबईतच भागवावी लागतेय सिद्धार्थला ‘मियामी’ची हौस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 12:14 IST

बॉलीवूड निर्मात्यांना विदेशात शूटींग करण्याचे भलतेच वेड आहे. कोणताही चित्रपट पाहा, कोणते ना कोणते कारण काढून विदेशात काही सीन्स ...

बॉलीवूड निर्मात्यांना विदेशात शूटींग करण्याचे भलतेच वेड आहे. कोणताही चित्रपट पाहा, कोणते ना कोणते कारण काढून विदेशात काही सीन्स चित्रित केलेच जातात. काही सिनेमे तर संपूर्णपणे फॉरेन लोकेशन्सवरच तयार होतात.मग असे असतानाही सिद्धार्थ मल्होत्राला मात्र मियामी शहरात घडणारे सीन्स मुंबईत बनवलेल्या सेटवरच शूट करावे लागत आहे.‘रिलोडेड’ नावाच्या चित्रपटाची शूटींग सध्या मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरू आहे. वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी अमेरिकेतील निसर्गरम्य शहर मियामी येथे शूटींग केले खरे; परंतु काही सीन्स पुन्हा चित्रित करण्याचे दिग्दर्शकांच्या मनात आले.राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित या अ‍ॅक्शन सिनेमाच्या निर्मात्यांना मात्र पुन्हा मियामीला जाऊन शूटींग करण्याचे परवडणारे वाटले नसावे म्हणून त्यांनी येथेच सेट लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एका हॉटेलच्या लाँड्रीरूममध्येच मियामी शहराचा सेट उभारण्यात आला.मियामीच्या नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्यावर ‘चिल’ करण्याची हौस सिद्धार्थला आता मुंबईतच पूर्ण करावी लागतेय. पण कसे आहे सिद्धार्थ, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है!                                चित्रपटात सिद्धार्थबरोबर जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वीसुद्धा या चित्रपटाच्या विदेशी चित्रिकरणाचा बेत फसला होता. मियामी येथे शूटींगचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर मलेशिया येथे शूटींग करण्यात येणार होती. तेथील प्रशासनाने शूटींग खर्चामध्ये सवलत देण्यास नकार दिल्यामुळे थायलंडची निवड करण्यात आली. परंतु थायलंडचे स्केड्यूलसुद्धा रद्द करण्यात आले होते. आता याला नशीबी म्हणावे की आणखी काही!बेटर लक नेक्स्ट टाईम सिद्धार्थ!