Join us

‘बेस्ट किसर’चा अ‍ॅवॉर्ड मिळावा सिद्धार्थला - आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 17:54 IST

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे कपल बॉलिवूडचं सर्वांत हॉट कपल आहे, हे आता काही सांगावं लागेल का? नाही ...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे कपल बॉलिवूडचं सर्वांत हॉट कपल आहे, हे आता काही सांगावं लागेल का? नाही ना. त्या दोघांनी माध्यमांसमोर त्यांचं नातं जरी अमान्य केलं असलं तरीही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात ही बाब काही नाकारता येण्यासारखी नाहीये. आता हेच पाहा ना! आलियाची इच्छा अशी आहे की, सिद्धार्थला ‘बेस्ट किसर’चा अ‍ॅवॉर्ड मिळावा. ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहता आलियाने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करून टाकले. शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांची जोडी प्रथमच यातून एकत्र आलीय. काही दिवसांपूर्वी नेहा धुपियाच्या शोवर एकदा अर्जुन कपूर म्हणाला,‘दीपिका आणि परिणीतीपेक्षा मला आलिया ‘बेस्ट किसर’ वाटते. हाच शेरा मग आलियाने सिद्धार्थसाठी वापरला. आलिया भट्ट ही बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अर्जुनच्या वक्तव्यावर बोलताना म्हणते,‘पाहा, मी अर्जुनला एका चित्रपटात किस केले आहे. तो एक चांगला किसर आहे पण मी सिदला दोन चित्रपटात किस केले आहे. त्यामुळे मला त्याच्यासोबत खुप प्रॅक्टिस आहे. त्यामुळे मला वाटतं की, सिद्धार्थला ‘बेस्ट किसर’चा अ‍ॅवॉर्ड मिळायला हवा.’