Join us
Daily Top 2Weekly Top 5

देश हमेशा रहना चाहिए..! सिद्धार्थ मल्होत्राचा थरारक ॲक्शनपट 'योद्धा'चा जबरदस्त ट्रेलर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 16:18 IST

शेरशाह नंतर योद्धा सिनेमात सिद्धार्थ बंडखोर लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर बघाच

गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्राच्या (Siddharth Malhotra) 'योद्धा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.  'योद्धा' निमित्ताने सिद्धार्थ पुन्हा एकदा भारतीय आर्मी ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहे.  'योद्धा' ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता नुकतंच  'योद्धा'चा (Yodha) जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'योद्धा'चा हा ट्रेलर अॅक्शन आणि थ्रिलर यांचा जबरदस्त संगम असून अंगावर रोमांच उभे राहतात. 

'योद्धा' च्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा 'शेरशाह' नंतर पुन्हा एकदा आर्मी ऑफीसरची भूमिका साकारताना दिसतोय. एक तापट आणि बंडखोर लष्करी अधिकारी अरुण जो देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं की, ऑफिसर अरुणला त्याच्या वडिलांसारखे व्हायचे आहे.पण काही कारणांनी त्याचं निलंबन होतं. पुढे अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या प्रवासी फ्लाइटचं संरक्षण करण्यासाठी अरुण सज्ज होतो. 

'योद्धा' च्या ट्रेलरमध्ये तगडी मारधाड दिसतेच. शिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्रीही पाहायला मिळते.  'योद्धा' मध्ये दिशा पटानी देखील एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय रोनित रॉय यांनी सिद्धार्थच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. 'योद्धा' सिनेमा १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रादिशा पाटनी