Join us  

Sid Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा-किआरा अडवाणी चे 'मिशन शादी', सिद्धार्थच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 1:27 PM

Sid Kiara : बॉलिवुड मध्ये लवकरच एका कपलच्या लग्नाची चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री किआरा अडवाणी ...

Sid Kiara : बॉलिवुड मध्ये लवकरच एका कपलच्या लग्नाची चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Adwani) यावर्षी लग्न करणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र अद्याप दोघांनी याबाबतच अधिकृत माहिती दिलेली नाही. नुकतीच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे ज्यात उद्या काहीतरी मोठी घोषणा करणार असे त्याने लिहिले आहे.यावरुन पुन्हा दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या पोस्टमध्ये एक फोटो टाकला आहे. घड्याळ्याच्या आकाराचे चित्र आहे. ज्यात त्याने लिहिले, 'मला एकस बोल्ड घोषणा करायची आहे. 'या फोटोला कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'काहीतरी बोल्ड आणि उत्साहित उद्या येत आहे.'

आता या पोस्टवर नेटकऱ्यांनी अंदाज बांधणं सुरु केलं आहे. लग्नाची डेट तर जाहीर करणार नाही ना असं चाहते म्हणत आहेत. तर ही कोणती तरी जाहिरात आहे असंही ताही चाहत्यांनी म्हणलं आहे. आता नक्की काय घोषणा आहे हे सिद्धार्थ उद्याच पोस्ट करेल.

'लस्ट स्टोरीज’च्या रॅपअप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट झाली. त्यानंतर ‘शेरशाह’ सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. या सिनेमात दोघेही मुख्य भूमिकेत होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवुडच्या अनेक पार्ट्यांमध्ये दोघेही एकत्र दिसतात.६ फेब्रुवारी रोजी दोघेही लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. चाहत्यांनाही दोघे कधी लग्न करतात याची उत्सुकता आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीसोशल मीडियालग्न