Join us

'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:23 IST

हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी येतोय 'परम सुंदरी'?

'स्त्री', 'मुंज्या' सह अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सचा आगामी 'परम सुंदरी' (Param Sundari) सिनेमा येत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही फ्रेश जोडी या सिनेमात दिसणार आहे. '२ स्टेट्‍स'सिनेमाशी मिळतीजुळतीच याची कथा असल्याचं आधी टीझरमध्ये दिसून आलं होतं. तर आता सिनेमाचा ट्रेलरही भेटीला आला आहे. यामध्ये सिद्धार्थ-जान्हवीची रोमँटिक केमिस्ट्री, कथा, गाणी यांची झलक दिसत आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

तुषार जलोटा दिग्दर्शित 'परम सुंदरी'चा ट्रेलर रिलीज झाला आगहे. २ मिनिट ४० सेकंदाच्या ट्रेलरने धमाल आणली आहे. दिल्लीचा मुंडा परमच्या भूमिकेत सिद्धार्थ हँडसम दिसतोय. तर केरळची सुंदरी या लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. केरळमधील मनमोहक दृश्य सिनेमात सुंदररित्या चित्रीत करण्यात आले आहेत. सिद्धार्थ-जान्हवीची जोडीही खूपच शोभून दिसत आहे. दोन वेगवेगळ्या राज्यातील हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. वेगळी संस्कृती, कुटुंबियांचा विरोध यात त्यांची कसोटी लागते. कॉमेडी, रोमान्स, थोडा रडवणारा आणि खिळवून ठेवणारा असा हा सिनेमा असणार आहे. 

दिनेश व्हिजान यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे. तुषार जलोटा यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर यांच्याशिवाय सिनेमात सिद्धार्थ शानकर, मनज्योत सिंह, संदय कपूर यांचीही भूमिका आहे. २९ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राजान्हवी कपूरबॉलिवूड