Join us

श्वेता म्हणतेय पुल्कित आणि माझ्या घटस्फोटासाठी यामीच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:51 IST

पुल्कित सम्राट आणि यामी गौतम यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी आहे अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. त्या ...

पुल्कित सम्राट आणि यामी गौतम यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी आहे अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. त्या दोघांनीच नेहमीच आपल्या नात्याबाबत मीडियात बोलणे टाळले आहे. पण त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे पुल्कितची पूर्वपत्नी श्वेता रोहिराचे म्हणणे आहे. श्वेताने नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मुंबईत माझ्या आईच्या बिल्डिंगमध्येच यामी राहात होती. मी आणि पुल्कित अनेकवेळा माझ्या आईकडे जात असे. त्यावेळी यामी आम्हाला भेटायला येत असे. ती माझ्या कुत्र्यासोबतही खेळत असे. तिने आणि पुल्कितने काही वर्षांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. सनम रे आणि जुनिनियत या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने यामी आणि पुल्कित दोघे जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला लागले. श्वेतामुळेच माझे लग्न मोडले. ती पुल्कितच्या आयुष्यात यायच्या आधी आमच्यात सगळे काही आलबेल होते. त्यामुळे आमच्या घटस्फोटासाठी यामीच जबाबदार आहे.