Join us

श्वेता नंदाने घेतला घटस्फोट ? गेल्या वर्षभरापासून राहते बच्चन कुटुंबियांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 15:06 IST

तब्बल लग्नाच्या २२ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदाही लाईमलाइटपासून लांबच राहणे पसंत करते. गेल्या काही एक दोन वर्षांपासून श्वेता चर्चेत आली आहे. बॉलिवूड पार्ट्या, एव्हेट्स, पुरस्कार सोहळे यात तिचे येणे जाणे वाढल्यापासून श्वेता नंदाची चर्चा सुरू झाली. खरंतर ती बच्चन कुटुंबियांसोबत व्हॅकेशनदरम्यान एन्जॉय करत असल्याचे ब-याचदा पाहायला मिळते. श्वेता नंदाने वयाची २२ व्या वर्षीच लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. श्वेताचे लग्न हे दिल्लीतील व्यावसायिक निखिल नंदासह झाले आहे. निखिल नंदा हा रणबीर कपूरचा चुलत भाऊ लागतो. म्हणून श्वेताही रणबीरची वहिनीचे देखील नाते आहे. 

 

श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे विविध फोटोंच्यामाध्यमातून तिच्या आयुष्यातील घडामोडी सा-यांनाच माहिती असतात. मात्र एक गोष्ट आहे जी आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. श्वेता नंदाचा देखील पती निखिल नंदासह घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून श्वेताही बच्चन कुटुबियांसोबत राहत आहे. तब्बल लग्नाच्या २२ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटाचे नेमके कारण समोर आले नसले तरी हे दोघे सध्या वेगळे राहत आहेत. तसेच श्वेताने इस्टाग्रामवर देखील नंदा आडनाव काढत केवळ श्वेता बच्चन ठेवले आहे. आता दिल्ली सोडून श्वेताने थेट मुंबई गाठत आई-वडिलांसह राहणे पसंत केले आहे. श्वेता आणि निखिल नंदा यांना दोन मुलं आहेत. मुलगी नव्या नवेली आणि अगस्त्य असे त्यांच्या मुलांची नावं आहेत.

विशेष म्हणजे श्वेताचे अमिताभसह चांगले नाते आहे. नेहमीच सोशल मीडियावर अमिताभ यांचे आपल्या लेकीवर असलेले जीवापाड प्रेम पाहायला मिळते. लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये  त्यांच्यातला दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबा पाहायला मिळतो. मात्र आई जया बच्चनसह श्वेताचे फारसे पटत नाही.

नेहमी या दोघींचे खटके उडत असतात. याला कारण म्हणजे केवळ जया बच्चनमुळेच श्वेताला वयाच्या २२ व्या वर्षी लग्न करावे लागले. ईच्छा नसताना तिने हे लग्न केले. लग्न जरी केले असले तरी तिच्या आयुष्यात ती खुश नव्हती. त्यामुळे श्वेताचे आयुष्याची वाट लागली यासाठी आई जया बच्चन जबाबदार असल्याचे ती समजते.

तर दुसरीकडे वहिनी ऐश्वर्यासह देखील श्वेताचे पटत नाही. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हे दोघे एकमेकांचे तोंड न पाहणेच पसंत करतात. तर भाऊ अभिषेकचे बहिण श्वेतावर खूप प्रेम आहे. नेहमीच सोशल मीडियावर या दोघां भाऊ -बहिणीचे प्रेम पाहायला मिळते.   

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन