आकाराने लहान असलेल्या या पर्सचे मूल्य कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही, परंतु ही पर्स लाख मोलाची आहे. आठ लाख ही किंमत खूप मोठी असून, एखाद्या सर्वसामान्याला या किमतीत एखाद्या शहरात छोटेखानी घर घरेदी करता येईल. ही पर्स हेर्मेस बिर्किन ब्रॅण्डची आहे. या पर्सचे नाव हॉलिवूड अभिनेत्री जेन बिर्किन हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
या पर्सचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ही पर्स जगातील सर्वांत महागड्या लेदरपासून बनविण्यात आली आहे. या लेदरला आॅस्ट्रिच लेदर असे म्हटले जाते. यामुळेच या पर्सची किंमत सर्वाधिक असते. त्याचबरोबर या पर्सच्या हॅण्डलवर गोल्ड पॉलिश करण्यात आलेली आहे.
असो, श्रीदेवीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, तिने बºयाच कालावधीनंतर २०१२ मध्ये ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून सिल्वर स्क्रीनवर कमबॅक केले. त्यानंतर ती ‘मॉम’ या चित्रपटात बघावयास मिळाली. आता तिची मुलगी जान्हवी कपूरही लवकरच बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे.