Join us

Stunning! श्रद्धा कपूरने शेअर केलेत हॉट फोटो, क्षणात झालेत व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:35 IST

श्रद्धा कपूरचे STAPLESS फोटोशूट

ठळक मुद्दे ‘स्ट्रीट डान्सर 3डी’नंतर लवकरच ती अहमद खानच्या सिनेमा ‘बागी 3’ या सिनेमात दिसणार आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कालच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि क्षणात हा ट्रेलर इंटरनेटवर व्हायरल झाला. या पाठोपाठ श्रद्धाच्या  फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

श्रद्धा कपूर नुकतीच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’च्या प्रमोशनसाठी एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये पोहोचली. यावेळी तिने घातलेल्या स्ट्रॅपलेस ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच स्ट्रॅपलेस ड्रेसमधील तिचे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आणि चाहत्यांच्या कमेंट्स जणू पूर आला.

  

या ड्रेसवर तिने ब्लॅक बूट्स घातले होते. सोबत हूप इअरिंग्स आणि सटल लिपस्टिक शेड-ब्लींग आयलायनरसोबत तिने हा लुक कम्प्लिट केला होता. 

 

रेमो डिसूजा दिग्दर्शित सिनेमा ‘स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये श्रद्धा कपूरसोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अपारशक्ति खुराना, नोरा फतेही आणि शक्ति मोहन त्यांच्यासोबत दिसणार आहेत.

 ‘स्ट्रीट डान्सर 3डी’नंतर लवकरच ती अहमद खानच्या सिनेमा ‘बागी 3’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 6 मार्च  2020 ला रिलीज होणार आहे. या सिनेमात श्रद्धासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूर