तरुणाई सध्या 'सैय्यारा' (Saiyaara) च्या रंगात रंगून गेली आहे. मोहित सूरी दिग्दर्शित 'सैय्यारा' सिनेमाने तरुणांना मंत्रमुग्ध केलं आहे. भावुक केलं आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नवोदित कलाकारांचं काम पाहून सगळेच प्रभावित झालेत. अहान पांडेचा तर हा पहिलाच सिनेमा आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या सिनेमावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'सैय्यारा'साठी थिएटर्समध्ये होणारी गर्दी पाहता त्याच्या क्रेझचा अंदाज येतो. अगदी 'आशिकी' व्हाईब्स देणारा हा सिनेमा आहे. 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरनेही (Shraddha Kapoor) 'सैय्यारा'पाहून प्रतिक्रिया दिली आहे.
करण जोहर, अनिल कपूर, आलिया भट, रणवीर सिंह ते वरुण धवन सगळेच स्टार्स 'सैय्यारा'चं भरभरुन कौतुक करत आहेत. 'आशिकी गर्ल' म्हणून ओळख मिळवलेली श्रद्धा कपूरनेही आता सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. थिटएरमधला व्हिडिओ शेअर करत ती लिहिते, 'सैय्यारा से आशइकी हो गयी है मुझे'. तसंच आणखी एक स्टोरी शेअर करत तिने 'सैय्यारा'मधला एका सीनचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये स्टेडियमध्ये अनीतचा रडतानाचा फोटो मोठ्या स्क्रीनवर दिसतो. जो पाहून अहान भावुक होतो. कारण तो एक वर्षापासून तिला शोधत असतो. हा सीन अगदीच भावुक करणारा आहे. याच सीनचा फोटो शेअर करत श्रद्धा लिहिते,"या सीनसाठी मी आणखी ५ वेळा सिनेमा बघेन. प्युअर सिनेमा...प्युअर ड्रामा ..प्युअर मॅजिक, उफ्..किती दिवसांनी इतकी भावुक झाले."
'सैय्यारा'ने तीनच दिवसात ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सोमवारीही सिनेमाने चांगला बिझनेस केला आहे. रविवारी ३५.७५ कोटी तर सोमवारी २२.५ कोटी कमावले आहेत. सैय्याराची आतापर्यंत एकूण कमाई १०५.७६ कोटी झाली आहे.