आपल्या साधेपणाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी श्रद्धा कपूर सध्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे घरी आराम करत आहे. अशा परिस्थितीत तिने एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. 'स्त्री' फेम अभिनेत्रीने पुढील चित्रपट तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत असेल, याची पुष्टी केली आहे. राहुल मोदी एक लेखक आणि चित्रपट निर्माता आहे.
मागील काही दिवसांपूर्वी, श्रद्धा 'ईठा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली. ती लावणी नृत्याचा एक सीन शूट करत असताना तिचा पाय फ्रॅक्चर झाला. अभिनेत्रीने तिच्या हेल्थची अपडेट देखील दिली आहे आणि सांगितले की तिची तब्येत सुधारत आहे. सोशल मीडियावर प्रश्नोत्तर सत्रादरम्यान तिने मस्करीत सांगितले की फ्रॅक्चरमुळे ती 'टर्मिनेटर' सारखी फिरत आहे.
'ईठा'नंतर श्रद्धा दिसणार या सिनेमातप्रश्नोत्तर सत्रादरम्यान श्रद्धा कपूर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. त्याच वेळी तिने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही माहिती दिली. अभिनेत्रीने सांगितले की 'ईठा' नंतर ती राहुल मोदीच्या एका चित्रपटात दिसणार आहे, जो स्टार्टअप्सच्या जगावर आधारित असेल. श्रद्धा म्हणाली की या चित्रपटातील तिची भूमिका खूप आव्हानात्मक आहे.
शहीद विजय साळसकर यांच्यावर येणार बायोपिकश्रद्धा कपूरने हे देखील सांगितले की, ती निर्माती म्हणून सुपर फॅट स्टुडिओसोबत दोन चित्रपटांची सह-निर्मिती करणार आहे. यापैकी एक चित्रपट धाडसी पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या कथेवर आधारित असेल, जे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अखिव अली करणार आहेत. विजय साळसकर यांनी दगडी चाळीतील अरुण गवळीच्या टोळीतील अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला होता.
Web Summary : Shraddha Kapoor, recovering from a fracture, revealed she'll star in her boyfriend Rahul Modi's film about startups. She is also co-producing a biopic on brave police officer Vijay Salaskar, who was martyred in the 26/11 attacks. Akhiv Ali will direct.
Web Summary : श्रद्धा कपूर, फ्रैक्चर से उबरते हुए, ने खुलासा किया कि वह अपने बॉयफ्रेंड राहुल मोदी की स्टार्टअप पर आधारित फिल्म में अभिनय करेंगी। वह 26/11 के हमलों में शहीद हुए बहादुर पुलिस अधिकारी विजय सालस्कर पर एक बायोपिक का सह-निर्माण भी कर रही हैं। अखिल अली निर्देशन करेंगे।