Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना करतेय तिच्या बाळासाठी शॉपिंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 17:17 IST

बॉलिवूडची ‘ग्लॅमरस गर्ल’ करिना कपूर खान ही आता तिच्या बाळाच्या आगमनासाठी किती उत्साहित आहे हे सांगण्याची गरज नाही. पुढच्या ...

बॉलिवूडची ‘ग्लॅमरस गर्ल’ करिना कपूर खान ही आता तिच्या बाळाच्या आगमनासाठी किती उत्साहित आहे हे सांगण्याची गरज नाही. पुढच्या महिन्यात बाळ तिच्या कुशीत असेल हे नक्की.  बाळासाठी काय करू अन् काय नको असे तिला होतेय. बाळासाठी तिने एक खास खोलीही बनवून घेतल्याचे कळतेय. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने स्वत: बाळासाठी तिच्या आवडीच्या कपड्यांची शॉपिंगही केलीये म्हणे. ती थेट बांद्रा येथे गेली अन् बेबीज नर्सरी या दुकानातून भरपूर शॉपिंग केली. सुत्रांनुसार, बेबोला तिच्या मित्रांनी या दुकानात बाळांच्या कपड्यांचे फार चांगले कलेक्शन असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिने तेथून बाळासाठीचे बेड, बेडशीट्स, कुशन्स, कुशन कव्हर, कर्टेन्स आणि बरंच काही खरेदी केलं. योगायोगाने काही महिन्यांपूर्वी शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर यांनीही याच दुकानातून मीशाचे कपडे खरेदी केले होते.काल करिनासाठी अमृता अरोरा लदाक यांच्या घरी खास डिनर आयोजित केला होता. काही दिवसांपूर्वी पती सैफ अली खान यानेही काही सजावटीच्या वस्तू, खेळणी आणि सामान खरेदी केले होते. थोडक्यात काय तर खान पती-पत्नी त्यांच्या बाळासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.