संदीप और पिंकी फरार चित्रपटात परिणीती आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी दोघे इश्कजादेमध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. चित्रपटाच्या कथेशिवाय यातील कलाकारांच्या लूक्सबद्दलही उत्सुकता दिसून येतेय. अर्जुनचा लूक तर आपण पाहिला. पण आता परिणीतीचा लूक कसा असेल, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. कारण सूत्रांचे मानाल तर अर्जुन व परिणीती दोघेही या चित्रपटात परंपरागत बॉलिवूड स्टाईलमध्ये दिसणार आहेत. तब्बल ४ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेकक्षकांच्या भेटीला येणार आहे.2013 मध्ये आलेल्या इश्कजादे चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. याबाबत अर्जुनला विचारले असता त्याने सांगितले की, ''आम्ही दोघेही या प्रोजेक्टसाठी फार उत्सुक आहोत, इश्कजादेनंतर आम्ही एकत्र काम नाही केले फक्त एक जाहिरातीत आम्ही केली होती. ‘संदीप और पिंकी फरार’नंतर ही जोडी विपुल शाह यांच्या ‘नमस्ते कनाडा’मध्येही दिसणार आहे.
ALSO RAED : SHOCKING!! चित्रपटाच्या सेटवर नशेत तर्र चाहत्याचा अर्जुन कपूरवर हल्ला!