Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : ​‘या’ सेलेब्रिटींना सलमान खानने मारली आहे चापट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 15:41 IST

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर  यांचा वाद आपणास माहित असेलच. मात्र हे असे पहिल्यांदाच घडले नसून सिनेसृष्टीत ...

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर  यांचा वाद आपणास माहित असेलच. मात्र हे असे पहिल्यांदाच घडले नसून सिनेसृष्टीत असे वाद बऱ्याचदा झाले आहेत. बॉलिवूडचा दबंग सलमान खाननेही बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींना थप्पड मारली आहे. जाणून घेऊया कोण आहेत ते सेलेब्स...!सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय बच्चनचे नाते तुटण्याचे कारण म्हणजे सलमानने ऐश्वर्याला मारलेली चापट होय. ऐश्वर्याने सुभाष घर्इंच्या चित्रपटात काम करु नये अशी सलमानची इच्छा होती. मात्र तरीही सुभाष घई सोबत ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्याने काम केले. याचा राग आल्याने एका पार्टीत सलमानने सुभाष घई यांना चापट मारली होती.एक्स गर्लफ्रेंड कैटरीना कैफलाही सलमानने चापट मारली आहे.  एका रेस्टॉरंटमध्ये सलमान आणि रणबीर कपूरचे भांडण झाले होते. त्यावेळी रणबीर टीनएजर होता. संतापात सलमानने रणबीरचे कॉलरच पकडले नाही तर त्याला चापटदेखील मारली होती. या भांडणाबाबत जेव्हा सलमानचे वडील सलीम खानला माहिती मिळाली तेव्हा सलमानला ऋषी कपूरच्या घरी घेऊन गेले आणि रणबीरची माफी मागितली होती. ‘तेरे नाम’च्या सेटवर दिग्दर्शक सतीश कौशिकला सलमानने चापट मारली होती.एवढेच नव्हे तर सलमानने त्याच्या बॉडीगार्डलाही थप्पड मारली आहे.