Join us

Shocking: अवघ्या 5 वर्षाची असताना घरातून पळून गेली होती 'ही' अभिनेत्री, कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 16:13 IST

आज बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण केले असले तरी सामाजिक कार्यातही ती सक्रीय असते.

दीया मिर्झा लवकरच थप्पड सिनेमात झळकणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती बिझी आहे. वेगवेगळ्या ठिकणी सिनेमाचे प्रमोशन होते. नुकतेच कपिल शर्मा शोमध्ये दीयाने हजेरी लावली होती. यावेली कपिलच्य प्रश्नावर उत्तर देताना दीया म्हणाली की, अवघ्या 5 वर्षाची असताना घरातून पळून गेली होती. दीयाच्या एका चुकीमुळे तिचे वडिल तिच्यावर ओरडले होते. हाच राग मनात धरून तिने रागारागात घरातून पळून गेली होती. 

नातेवाईकांच्या घरी पूर्ण दिवस फिरत होती. आई-वडिलांनी तिचा दिवसभर शोध घेतला आणि शेवटी नातेवाईकांच्या घरी दीया होती. तसेच वयाच्या 21 व्या वर्षी एका खाजगी कारणामुळे आईच्या हातचाही मार खाल्ला असल्याच्या आठवणी तिने यावेळी शेअर केल्या.दीयाने आज बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण केले असले तरी सामाजिक कार्यातही ती सक्रीय असते. 

दीयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पती साहिल संघापासून घटस्फोट घेतला. दीया म्हणाली, "माझ्या आई-वडिलांनी 34 घटस्फोट घेतला. तेव्हा मी फक्की चार वर्षाची होती. इतक्या लहान वयात आईवडिलांना वेगळे होतानाचा त्रास मी सहन करून शकले. आणि आज वयाच्या 37 व्या वर्षी मी माझ्या घटस्फोटातून स्वतःलाही सावरत आहे. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले असले तरीही त्याचा आयुष्यावर थोडातरी फरक होतोच हे नाकारू शकत नाही. दिया आणि साहिल दोघेही बिझनेसपार्टनर होते. घटस्फोट झाल्यानंतर आता त्यांच्या व्यवसायात चढउतार येत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :दीया मिर्झा