SHOCKING ! ‘बिग बॉग’च्या घरात अभिनेत्री ओवियाचा आत्महत्येचा प्रयत्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 14:04 IST
सध्या ‘बिग बॉग तामिळ’ चांगलाच चर्चेत आहे. टीआरपी आणि ट्रेंडच्या शर्यतीत या रिअॅलिटी शोने अव्वल क्रमांक मिळवला आहे. सध्या ...
SHOCKING ! ‘बिग बॉग’च्या घरात अभिनेत्री ओवियाचा आत्महत्येचा प्रयत्न!!
सध्या ‘बिग बॉग तामिळ’ चांगलाच चर्चेत आहे. टीआरपी आणि ट्रेंडच्या शर्यतीत या रिअॅलिटी शोने अव्वल क्रमांक मिळवला आहे. सध्या या शोची स्पर्धक ओविया हेलन चर्चेत आहे. कधी ‘बिग बॉस’च्या घरातील भांडणांमुळे, कधी इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे ओविया चर्चेत होती. पण आता ओवियाने असे काही केले की, सगळीकडेच खळबळ माजली. यावेळी या शोमध्ये असे काही पाहायला मिळाले की, सगळ्यांनाच धक्का बसला.ताज्या बातमीनुसार, ओवियाने ‘बिग बॉस’च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. आरव या प्रतिस्पर्धकाच्या वागण्यामुळे ती निराश होती आणि या नैराश्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते. शुक्रवारी ओवियाने ‘बिग बॉस’च्या घरातील स्विमींग पूलमध्ये उडी घेतली आणि स्वत:ला डुंबवण्याचा प्रयत्न करू लागली. रिपोर्ट्सनुसार, सहा आठवडे ‘बिग बॉस’च्या घरात राहणारी ओविया तिचा को-कंटेस्टंट आरववर भाळली होती. मात्र आरवने तिचा प्रेमप्रस्ताव नाकारला. यामुळेच नाराज होत, ओवियाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते. या घटनेनंत पोलिसही ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचल्याचे म्हटले जातेय. अर्थात शोच्या मेकर्सनी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात ओविया आणि आरवदरम्यान ओवियाच्या या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर या शोचा होस्ट कमल हासन आणि निर्मात्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.कमल हसन ‘बिग बॉस’चे तामिळ व्हर्जन होस्ट करतो आहे. २६ वर्षांची ओविया तामिळ अभिनेत्री आहे. ‘कलवानी’,‘अगर्थीं’,‘मर्नियां’, ‘पुलिवाल’,‘१४४’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘ये है इश्क सरफिरा’ या बॉलिवूडपटातही ती दिसली होती.