Join us

SHOCKING: शेजाऱ्यांनी केली संजय दत्तविरोधात पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:06 IST

संजय दत्त पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. तो राहत असलेल्या सोसायटीतील लोकांनी त्याच्याविरोधात पोलिसांत या महिन्याभरात ...

संजय दत्त पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. तो राहत असलेल्या सोसायटीतील लोकांनी त्याच्याविरोधात पोलिसांत या महिन्याभरात दुसरी तक्रार नोंदविली आहे. संजयच्या घरी रात्री उशिरापर्यंत मोठ्याने गाणी वाजवली जातात व त्याचा संपूर्ण शेजाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून त्यांनी त्याच्या विरोधात पोलिसांत पुन्हा एकदा तक्रार केली.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या घरी रात्री उशिरापर्यंत जोरजोरात संगीत वाजत असल्यामुळे शेजाऱ्यांनी शुक्रवारी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी संजयच्या घरी जाऊन आवाज बंद केला. विशेष म्हणजे मागच्या महिन्यात १४ जानेवारी रोजीसुद्धा शेजाऱ्यांनी अशाच प्रकारे पोलिसांकडे तक्रार केली होती.सुरुवातीला केवळ पोलिस नियंत्रक कक्षाकडे संजयची तक्रार करण्यात आली होती; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. संजयच्या अशा वागण्याने त्याचे शेजारी पुरते हैराण आहेत. ते म्हणतात की, पहाटेपर्यंत चालणाऱ्या पार्टीज आणि कर्णक र्कश संगीतामुळे सोसायटीतील सगळे लोक परेशान झाले आहेत. संजयवर मात्र याचा काहीच परिणाम होत नाही. इतरांच्या त्रासाशी त्याला काही देणे घेणे नाही. त्यामुळे सगळे रहिवासी त्याच्यावर नाराज आहेत. ALSO READ: जेव्हा संजय दत्त निघाला होता रणबीर कपूरच्या वडिलांना मारायला...सोसायटीद्वारे संजयला रीतसर ताकीदही देण्यात आली होती; परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. पाली हिल रेसिडेंट्स असोसिएशनचे चेयरमन डॉ. अमिताव शुक्ला म्हणाले, ‘अशा प्रकारचे वागणे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. सोसायटीच्या पुढच्या वार्षीक सभेत आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत. विभागाच्या पोलिस उपायुक्ताकडेदेखील आम्ही संजय दत्तवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.’हे सर्व पाहता संजयच्या अडचणी लवकर सुटणार नाहीत असे दिसतेय. सध्या त्याच्या जीवनावर राजकुमार हिराणी बायोपिक बनवित असून त्यामध्ये रणबीर कपूर संजूबाबच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच शिक्षा भोगून आल्यानंतर तो स्वत:ही बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. ओमांग कुमार दिग्दर्शित ‘भूमी’ चित्रटपात तो दिसणार आहे.