Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! निर्मात्यानं अभिनेत्रीला सांगितले चक्क कपडे उतरवायला, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:46 IST

या निर्मात्याचे वय ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

बॉलिवूडमध्ये आलेल्या मीटू वादळामुळे तनुश्री दत्तासोबत आतापर्यंत कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट प्रकार व लैंगिक शोषणाबाबतचा खळबळजनक खुलासा केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी झरीन खान, एली अबराम व सुरवीन चावलाने कास्टिंग काऊचबाबतचा खुलासा केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री मल्हार राठौरचं नावही समोर आलं आहे. मल्हारनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिच्या सुरूवातीच्या काळात तिला आलेल्या वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.

जाहिरात व वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री मल्हार राठौरला ६५ वर्षीय निर्मात्याने तिला कपडे उतरवायला सांगितल्याचा धक्कादायक खुलासा केला. 

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री मल्हार राठौरनं काही दिवसांपूर्वी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला. यावेळी तिने तिला करियरच्या सुरूवातीच्या दिवसांत आलेल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, एका ६५ वर्षीय निर्मात्याने मला माझे कपडे उतरवण्यास सांगितले होते. त्यावेळी मी खूपच घाबरले होते. मला समजत नव्हतं की मी काय करावे.

मल्हार पुढे म्हणाली, लहानपणीदेखील मला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. मात्र आता या गोष्टींचे प्रमाण आता वाढलेले आहे. याशिवाय मला एका अभिनेत्यानंही सांगितलं की, जर बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी टिकून राहणे कठीण असते.

मल्हार राठौरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती बऱ्याच जाहिरातींमध्ये झळकली आहे.

याशिवाय तिने हॉटस्टारच्या ‘तेरे लिए ब्रो’, ‘सनसिल्क रिअल एफएम’, ‘होस्टेजेस सीरिज’मध्ये काम केले आहे. 

टॅग्स :कास्टिंग काऊचमीटूतनुश्री दत्ताजरीन खान