Join us  

Drishyam 2 Director Abhishek Pathak : 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक गोव्यात करणार लग्न...नवरी कोण आहे माहितेय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 11:12 AM

Drishyam 2 Director Abhishek Pathak : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी उद्या ६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत आहेत. सिड व कियाराच्या लग्नानंतर बॉलिवूडचं आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी उद्या ६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत आहेत. सिड व कियाराच्या लग्नानंतर बॉलिवूडचं आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. आम्ही बोलतोय 'ते ये साली आशिकी' व 'खुदा हाफिज' यासारख्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय व 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak)या कपलबद्दल. होय, शिवालिका व अभिषेक दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघंही गोव्यात लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. येत्या 8 व 9 फेब्रुवारीला दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 9 फेब्रुवारीला दोघं लग्न करतील.

गेल्या 24 सप्टेंबरला शिवालिकाने एक व्हिडीओ पोस्ट करत, निर्माता दिग्दर्शक अभिषेक पाठकसोबतचं आपलं नातं ऑफिशिअल केलं होतं. 24 जुलैला शिवालिकाच्या वाढदिवशी या कपलने साखरपुडा केला होता.

अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी...शिवालिकाने एका चॅट शोमध्ये आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, मी खुदा हाफिज या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. अभिषेकला भेटण्याआधी मी त्याचे वडील कुमार मंगत पाठक यांना भेटले होतं. नंतर अभिषेकशी भेट झाली. आमचे खूप कॉमन फ्रेन्ड असल्याचं आम्हाला कळलं. हळूहळू आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि यानंतर आम्ही कधी प्रेमात पडलो ते कळलंच नाही. अभिषेकने तुर्कस्थानमध्ये शिवालिकाला प्रपोज केलं होतं.

शिवालिकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 2014 साली आपलं फिल्मी करिअर सुरू केलं. किक या चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. 2019 मध्ये तिला ये साली आशिकी या चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. खुदा हाफिजमध्ये ती लीड रोलमध्ये झळकली. अभिषक पाठक याने 'दृश्यम 2' दिग्दर्शित केला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

टॅग्स :दृश्यम 2बॉलिवूडसेलिब्रिटी