Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा योगासाठी दुबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:31 IST

 नुकत्याच पार पडलेल्या एका योगाच्या सेशनमध्ये योगागुरू रामदेव बाबा यांच्यासोबत शिल्पा शेट्टी हिने योगा केला. पण आता ती एक्स ...

 नुकत्याच पार पडलेल्या एका योगाच्या सेशनमध्ये योगागुरू रामदेव बाबा यांच्यासोबत शिल्पा शेट्टी हिने योगा केला. पण आता ती एक्स योगा दुबई येथील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेली आहे. योगा हे शिल्पाचे खरंतर पॅशनच आहे. ती योगा प्रशिक्षक सुनील सिंग यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत शिकत असून ते दोघेही मुख्य योगाचे सेशन होस्ट करणार आहेत. दोन दिवसीय हे सेशन असून दुबई आणि एक्स दुबई येथे सुरू राहणार आहे. ती म्हणते,‘ जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन योगा क रायला सुरू केल्यानंतर बदलून जातो. मन, शरीर आणि आत्मा यांचा ताळमेळ आपल्याशी जमतो. हे व्यासपीठ त्यासाठीच खुले करण्यात आले आहे. वेगवेगळे व्यायामाच्या प्रकारांना येथे प्रोत्साहन देता येईल.’