Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा करतोय 'या' क्षेत्रात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:30 IST

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राने राहत फतेह अली खानचा आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे.

ठळक मुद्देहा व्हिडीओ १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइनडेला लाँच होणार आहे

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राने राहत फतेह अली खानचा आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. या व्हिडीओमध्ये टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचे पती रोहित रेड्डी दिसणार आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधील काही भाग या शिल्पा आणि राज यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीवर आधारित आहे.

रोहित मूळचा अभिनेता नसल्याने आणि त्यात डान्स करायचे नाही असे ठरवल्याने सुरुवातीला तो या व्हिडीओत काम करण्याबाबत साशंक असल्याचे राज सांगतो. राजने मंज मुसिक आणि सुमित मेहरा यांसोबत मिळून स्वतःचे म्युझिक  वन रेकॉर्डस् या म्युझिक कंपनीचा स्थापना केली आहे.  हे गाणे सनी ब्राऊन यांनी लिहिले व संगीतबद्ध केले आहे. राज आणि रॉबिन बेहल यांनी मिळून दिग्दर्शन केलेला हा व्हिडीओ १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइनडेला लाँच होणार आहे. 

भविष्यात राजला सिनेदिग्दर्शनात उडी घ्यायची इच्छा आहे का विचारल्यावर तो सांगतो, 'एक व्हिडीओ करून मला दिग्दर्शनाचे काम किती अवघड आहे हे समजले आहे. आता दिग्दर्शकाच्या बाबत असलेला माझा आदर अधिक वाढला आहे. यातून मी खूप शिकलो आहे. माझ्या बकेट लिस्टमधून या एका गोष्टीवर फुलीही मारता आली. मात्र आता मी पुढे हे काम करेन की नाही हे आता सांगता येणे अवघड आहे.'

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा