Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्लिन चोप्राचा ब्रेस्ट इम्प्लांट्स हटवण्याचा निर्णय, हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:53 IST

शर्लिन चोप्राने ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय का घेतला?

नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन शर्लिन चोप्रा  सध्या एका तिच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शर्लिनने आपले ब्रेस्ट इम्प्लांट्स (Breast Implants) काढून टाकले आहेत. या शस्त्रक्रियेपूर्वी शर्लिनने रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर करत तिच्या वेदना आणि या निर्णयामागील कारण स्पष्ट केले.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, "गेल्या अनेक महिन्यांपासून, मला माझी पाठ, छाती, मान आणि खांद्यांमध्ये तीव्र आणि असह्य वेदना होत होत्या". अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर, या वेदना तिच्या शरीरातील जड ब्रेस्ट इम्प्लांट्समुळे होत असल्याचे निदान झाले. याच कारणामुळे तिने हे इम्प्लांट्स काढून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. 

शर्लिननं सांगितलं की, "मी थोडीशी घाबरलेली आहे. पण, त्याच वेळी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी खूप उत्साहित आहे. देवाने मला आणि माझ्या सर्जनला या शस्त्रक्रियेत यश द्यावे अशी मी प्रार्थना करते". शर्लिनने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिची भूमिका अधिक स्पष्ट केली. तिने सांगितले की, ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याची तिची ही दुसरी पायरी आहे. 

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "ऑगस्ट २०२३ मध्ये, मी माझ्या चेहऱ्यावरील सर्व फिलर (Fillers) काढून टाकले, जेणेकरून मी माझा खरा चेहरा पाहू शकेन. आणि आज, मी ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी करत आहे, जेणेकरून मी मुक्त जीवन जगू शकेन". यासोबतच तिने स्पष्ट केले की, ही पोस्ट फिलर, सिलिकॉन इम्प्लांट्स किंवा ते निवडणाऱ्यांवर टीका करण्यासाठी नाही, तर तिने स्वतःला आहे तसे स्वीकारले आहे, हे दाखवण्यासाठी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sherlyn Chopra removes breast implants, shares video from hospital.

Web Summary : Sherlyn Chopra removed her breast implants to alleviate chronic pain. In a video, she explained that the implants caused severe back, chest, and shoulder pain. She expressed excitement about starting a new, liberated chapter in her life.
टॅग्स :शर्लिन चोप्राबॉलिवूड