रमेश देव पुढे म्हणाले की, शशी हा असा अभिनेता होता, ज्याने कधी अभिनेता होण्याचा मिजास मिरविला नाही. तो नेहमी संपूर्ण युनिटला हसवायचा, खेळवायचा. शशी कपूरला एकदा रमेश देव यांनी सिंगल अभिनेता म्हणून काम करण्यासदंर्भात विचारले असता, ‘मी जेव्हा सिंगल हिरो म्हणून काम करण्याची अपेक्षा करेल तेव्हा कदाचित फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडेल, आणि मला बाहेर पडायचे नाही, म्हणून मी मोठ्या स्टार्ससोबतच काम करु इच्छितो,’ असे म्हटले होते.
शशीने अमिताभ बच्चन तसेच राजेश खन्नासोबतही काही चित्रपट केले आहेत. शशीचे यावेळी जाणे एकंदरीत चांगलेच झाले, असेही रमेश देव म्हटले. कारण त्यांचे या वयात खूपच हाल होत होते. त्यांच्याजवळ कोणीच नव्हते. म्हणून एकंदरीत शशीसाठी चांगलेच झाले पण आम्हासाठी अतिशय दुख:द घटना आहे. कपूर घराण्यात शरीराने मोठे होणे ही खूप वाईट गोष्ट आहे, शशीदेखील आता शरीराने खूप मोठा झाला होता. असेही रमेश देव म्हणाले.