Join us

Good News! ऋषी कपूर यांच्या बहुचर्चित 'शर्माजी नमकीन'चं पोस्टर प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 12:24 IST

Sharmaji namkeen : शनिवारी (४ सप्टेंबर) ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

ठळक मुद्दे'शर्माजी नमकीन' या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्यांच्या आठवणीत चाहत्यांचे डोळे पाणावतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचा प्रदर्शित होणार 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे अखेर या चित्रपटाचं दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे सध्या ऋषी कपूर यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

शनिवारी (४ सप्टेंबर) ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शर्माजी नमकीन या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात पहिल्या पोस्टरमध्ये ऋषी कपूर झळकले असून दुसऱ्या पोस्टरमध्ये परेश रावल दिसून येत आहेत.

हिंदी कलाविश्वातील सर्वात नामांकित अभिनेते ऋषी कपूर यांचा एक खास चित्रपट शर्माजी नमकीनचं पोस्टर रिलीज करताना आम्हाला विशेष अभिमान वायतोय. त्यांचं उत्कृष्ट काम आणि कारकिर्दीचा वारसा कायमच आमच्याकडून जपला जाईल, असं कॅप्शन हे पोस्टर शेअर करत चित्रपट मेकर्सने दिलं आहे.

सिध्दार्थला निरोप देताना 'हे' होते शहनाजचे अखेरचे शब्द 

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती मॅकगफिन पिक्चर्सने केली असून प्रस्तुती एक्सेल एंटरटेन्मेंटची आहे. हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर,हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांनी केली असून कासिम जगमगिया यांनी सहनिर्मित केली आहे.