Join us
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांनंतर दिसली शाहरुखची 'अ‍ॅना', अभिनेत्रीला पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले - इतकी क्युट होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:01 IST

Suchitra Krishnamoorthi : अभिनेता शाहरुख खानचा 'कभी हा कभी ना' हा चित्रपट आठवत असेलच ना. या चित्रपटात शाहरुखसोबत दिसलेली निरागस आणि अत्यंत सुंदर 'अ‍ॅना' म्हणजेच सुचित्रा कृष्णमूर्तीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा 'कभी हा कभी ना' हा चित्रपट आठवत असेलच ना. या चित्रपटात शाहरुखसोबत दिसलेली निरागस आणि अत्यंत सुंदर 'अ‍ॅना' म्हणजेच सुचित्रा कृष्णमूर्ती(Suchitra Krishnamoorthi)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. सुचित्राने तिच्या चुलबुली शैलीने आणि निरागस वागण्याने प्रेक्षकांना इतके वेड लावले की आजही तो चेहरा त्यांच्या मनात घर करून कायम आहे. पण आता तो चेहरा खूप बदलला आहे आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून खूप दूर आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहून सुचित्राला ओळखणे कठीण झाले आहे.

२७ नोव्हेंबर १९७५ रोजी जन्मलेल्या सुचित्राने वयाच्या १२-१३ व्या वर्षी 'चुनौती' या मालिकेतून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मॉडेलिंग देखील केले आणि दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, तिला खरी ओळख तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपट 'कभी हा कभी ना' मधून मिळाली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेल्या सुचित्राने तिच्या गोंडस हास्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील 'आना मेरे प्यार को' हे गाणेही खूप लोकप्रिय झाले होते.

यानंतर सुचित्रा अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली. सुचित्रा अभिनयासोबतच गायनातही पारंगत आहे. एका मुलाखतीदरम्यान सुचित्राने सांगितले होते की, तिला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तिच्या कुटुंबाला तिने चित्रपटांमध्ये काम करावे असे वाटत नव्हते. तिने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी घरही सोडले होते.

टॅग्स :शाहरुख खान