बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख नुकताच 'बार्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दिसला. या कार्यक्रमात शाहरुखने महाराष्ट्राबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्याने महाराष्ट्राची भूमी आणि येथील लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. याशिवाय जसं प्रेम तुम्ही मला दिलं तसंच प्रेम आर्यनला सुद्धा द्या, अशा भावनिक शब्दात सर्वांना आवाहन केलं. काय म्हणाला शाहरुख? जाणून घ्या
शाहरुख खानने महाराष्ट्राबद्दल केलं प्रेम व्यक्त
शाहरुख खान म्हणाला, "मी मुंबई आणि महाराष्ट्रातील या पावन भूमीचा खूप आभारी आहे." असं म्हणताच शाहरुख जमिनीला स्पर्श करुन नमस्कार करतो. पुढे शाहरुख म्हणतो, "संपूर्ण भारत देशातील पावन भूमीचा मी आभारी आहे. या भूमीने मला गेली ३० वर्ष तुमचं मनोरंजन करण्याची संधी दिली. आज खूप खास दिवस आहे. कारण याच पावन भूमीवर माझा मुलगाही पहिलं पाऊल टाकतोय. खूप छान वाटतंय जसं प्रत्येक बापाला वाटतं."