Join us

"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:07 IST

शाहरुख आणि राणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांना ३३ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यामुळे दोघांच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. शाहरुख आणि राणी मुखर्जीची जोडी स्क्रीनवर प्रचंड गाजली. 'कुछ कुछ होता है','चलते चलते', 'कभी अलविदा ना कहना' या सिनेमांमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसली.  आता राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघं एकमेकांना भेटले. शाहरुखने सोशल मीडियावर राणीसोबत एक रील शेअर केलं आहे.  

शाहरुख आणि राणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. किंग खान आकाशी रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. तसंच त्याने कानटोपीही घातली आहे. त्याच्या हाताला अजूनही पट्टी लावलेली दिसत आहे. तर राणी मुखर्जी पांढऱ्या शर्टमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.  शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या आगामी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमधील गाण्यावर त्यांनी हे रील शेअर केलं आहे. 

"राष्ट्रीय पुरस्कार...आमच्या दोघांची अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण झाली आहे...अभिनंदन राणी, तू क्वीन आहेस..लव्ह यू".'राणी आणि किंग एकाच फ्रेममध्ये','सर्वात बेस्ट रील' असं म्हणत अनेकांनी शाहरुखच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. 

शाहरुख खानला 'जवान' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राणी मुखर्जीला 'नॉर्वे व्हर्सेस मिसेस चॅटर्जी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाहरुख आणि राणी फिल्म इंडस्ट्रीत ३० वर्षांहून अधिक काळापासून आहेत. एकापेक्षा एक दमदार सिनेमे त्यांनी दिले आहेत. अखेर आता त्यांना राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपातून त्यांच्या कष्टाचं फळ मिळणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानराणी मुखर्जीबॉलिवूडराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार