Join us

शाहरुखने रिलीज केले मरियप्पनचे पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 16:50 IST

सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या धनुष दिग्दर्शित आगामी ‘मरियप्पन’ या चित्रपटाचे पोस्टर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट ...

सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या धनुष दिग्दर्शित आगामी ‘मरियप्पन’ या चित्रपटाचे पोस्टर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. हा चित्रपट पॅराआॅलिंपिक हाय जंपर मरियप्पन थंगावेलू याच्या जीवनावर आधारित आहे. ऐश्वर्या धनुष व शाहरुख खान यांनी नवीन वर्षांची भेट त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या अभिनेता धनुषची पत्नी असून, तिच्या दिग्दर्शनात तयार होणारा मरियप्पन हा पहिला चित्रपट आहे. तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील या खेळाडूवर आधारित आहे. मरियप्पन याने पॅरालम्पिक स्पर्धेत टी-४२ कॅटेगरीत उंच उडीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. हा चित्रपट त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे.  शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मरियप्पनचे पोस्टर रिलीज केले. शाहरुखने पोस्टर रिलीज करताना लिहिले की, ‘‘सादर करीत आहे, मरियप्पन थंगावेलूच्या बायोपिकचा फर्स्ट लूक, आमचा नॅशनल हिरो, आॅल द बेस्ट ऐश्वर्या रजनीकांत धनुष!’’ या पोस्टरवर एक टॅग लाईन लिहिण्यात आली आहे. ‘‘जग  जसा विचार करते; तसा विचार तुम्ही करू शकत नाहीत, पण महत्त्वाचे हे आहे की तुम्ही काय विचार करता’’. ऐश्वर्या धनुषने या पोस्टवर शाहरुखचे आभार मानले आहे. सोबतच नवीन वर्षांच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रजनीकांतच्या दुसºया मुलीच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. आपल्या मुलीचे लग्न वाचविण्यासाठी रजनीकांत व बहीण ऐश्वर्याने पुढाकार घेतला होता. २०१६ साली बॉलिवूडमध्ये सर्वाधिक बायोपिक रिलीज झाले आहेत. २०१७ सालात देखील अनेक बायोपिक रिलीज होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता याची सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. }}}}