Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खान लवकरच सुरु करणार 'पठाण' सिनेमाचे शूटिंग,'या' ठिकाणी तयार होतोय भव्यदिव्य सेट

By गीतांजली | Updated: October 12, 2020 13:56 IST

अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स दीर्घकाळापासून त्याच्या आगामी सिनेमाची वाट बघतायेत.

अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स दीर्घकाळापासून त्याच्या आगामी सिनेमाची वाट बघतायेत. लवकरच शाहरुख खान त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अजून याची ऑफिशियल घोषणा झालेली नाही. शाहरुख खानने सिद्धार्थ आनंद यांचा 'पठाण' सिनेमा काही दिवसांआधी साईन केला होता. 

नोव्हेंबरमध्ये करणार शूटिंगला सुरुवातया एक्शन-थ्रीलर सिनेमाचे शूटिंग शाहरुख नोव्हेंबरपासून सुरु करु सकतो. आधी याचे शूटिंग मे-जूनमध्ये सुरु होणार होते मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले.नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आधी या सिनेमाचे शूटिं परदेशात होणार होते मात्र आता बरेचसे शूटिंग मुंबईत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाच्या शूटिंगसाठी शानदार आणि बिग बजेट सेट तयार करण्यात येतो आहे. 

रिपोर्टनुसार, आधी 'पठाण' सिनेमाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार होते, मात्र आता नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. या सिनेमासाठी शाहरुख खानने केस वाढवले असल्याची माहिती आहे. शाहरुख खान व्याक्तिरिक्त या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका आहे.  आता या सिनेमाची ऑफिशियल अनाउंसमेंट होण्याची प्रतीक्षा आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान मागील वीस महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. शेवटचा तो आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटात झळकला होता. त्यामुळे शाहरुखचे फॅन्स त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यास आतुर आहेत.   

टॅग्स :शाहरुख खान